Sev Puri green spicy chutney: स्ट्रीट स्टाईल शेवपुरीची हिरवी चटणी आता बनवा घरच्या घरी, पाहा रेसिपी

Surabhi Jayashree Jagdish

शेवपुरी

शेवपुरी खायला जवळपास प्रत्येकाला आवडते. मात्र पावसाळ्यात बाहेरची शेवपुरी आपण खात नाही.

स्ट्रीट स्टाईल शेवपुरीची चटणी

अशा वातावरणात आपण घरीच शेवपुरी बनवतो. स्ट्रीट स्टाईल शेवपुरीची चटणी घरीच कशी बनवायची ते पाहूयात.

साहित्य

१ वाटी कोथिंबीर, १/२ वाटी पुदिना पाने, ४-५ हिरव्या मिरच्या, १/२ इंच आले, ५-६ लसूण पाकळ्या, १-२ चमचे डाळवं, १/२ लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, १/४ चमचा काळे मीठ, १/२ चमचा जिरे, थोडी साखर, थोडे थंड पाणी

कृती

मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या, आले, लसूण, डाळवं आणि जिरे घ्या.

मीठ-साखर

यामध्ये मीठ, काळे मीठ आणि थोडी साखर घाला.

लिंबाचा रस

आता लिंबाचा रस आणि थोडे थंड पाणी घालून बारीक वाटून घ्या.

घट्टसर पेस्ट

चटणी जास्त पातळ करू नका. शेवपुरीवर पसरवण्यासाठी योग्य अशी घट्टसर पेस्ट बनवा. गरज वाटल्यास थोडे पाणी घालून पुन्हा वाटून घ्या.

Cooking Tips No Onion: कोणत्या भाज्यांना कांद्याची फोडणी देऊ नये?

येथे क्लिक करा