Saam Tv
कोबी, टोमॅटो, हिरवे वाटाणे, उरलेली चपाती, जीरे, मीठ, आलं-लसणाची पेस्ट, चीज, तेल किंवा बटर इ.
सर्वप्रथम तुम्ही एका पॅनमध्ये फ्रॅंकीचे स्टफींग तयार करा. त्यासाठी तेल गरम करा.
आता तुम्ही कोबी,टोमॅटो, चीज हे उभ्या आकारात कापा किंवा किसून घ्या.
गरम झालेल्या तेलात आलं-लसणाची पेस्ट अॅड करा. आणि जीऱ्याची फोडणी द्या.
आता फोडणीत भाज्या छान परतून घ्या. मग त्यात मीठ अॅड करून घ्या.
आता चीज बारिक किसून मिश्रणात अॅड करा. आणि स्टफींग तयार करा.
आता उरलेल्या चपातीत भाजी ठेवा आणि त्याचा फ्रॅंकीसारखा रोल तयार करून तव्यावर फ्रॅंकी गरम करा. फ्रॅंकीला तेल लावून क्रंचीसुद्धा करू शकता.
तयार आहे तुमची क्रंची चीज फ्रॅंकी. लहान मुलांना स्ट्रीट स्टाईल फूड्स खायला खूप आवडतात. पण ते त्यांच्या शरीरासाठी सगळ्यात घातक असू शकतात.
लहान मुलांना टेस्टी खाण्याची सवय असते. मग तुम्ही उरलेल्या चपात्यांपासून ही स्ट्रीट स्टाईल फ्रॅंकी घरच्या घरीच तयार करू शकता.
NEXT : ऐकावं ते नवलच! पाणी प्यायल्याने होतो मृत्यू, हा प्राणी तुम्हाला माहितीये का?