Siddhi Hande
मुंबईसह राज्यात मस्त पाऊस पडत आहे. पावसात गरमागरम वडापाव खायची मजा काही वेगळीच असते.
वडापाव तर सर्वजण खातात परंतु तुम्ही कधी चीज वडापाव खाल्ला आहे का?
चीज वडापाव बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला बटाटे कुकरला लावून मस्त शिजवून घ्यायचे आहेत.
यानंतर तुम्हाला आलं-लसूण मिरची आणि जिरं मिक्समध्ये चांगलं वाटून घ्यायचं आहे.
यानंतर बटाटे सोलून घ्या. एका कढईत तेल टाका.
त्यात मोहरी चांगली तडतडू द्या. त्यात आलं-लसूण पेस्ट टाका.त्यात हळद टाका. त्यानंतर त्यात मॅश केलेला बटाटा टाका.
हे सर्व मिश्रण मस्त मिक्स करुन घ्या. त्यानंतर गॅस बंद केल्यावर वरुन कोथिंबीर टाका.
यानंतर एका भांड्यात बेसन पीठ घ्या. त्यात थोडं तिखट आणि मीठ टाका. त्यात पाणी टाका. मिश्रण जास्त पातळ करु नका.
आता तुम्हाला बटाट्याच्या भाजीचे गोळे बनवायचे आहे. त्यात छोटा छेद करा. त्याच चीज क्युब टाका.
यानंतर वरुन परत भाजी टाका. त्यानंतर हे गोळे बेसन पीठात बुडवा.
कढईत तेल तापवून घ्या. त्यात हे वडे सोडा.वडे गोल्डन ब्राउन होईपर्यंत मस्त तळून घ्या.