ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भेंडी, शेंगदाण्याचे कूट, लसूण, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर, धने पावडर, जीरे पावडर, तेल, गुळ, मोहरी, हिंग आणि मीठ
सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्या. भेंडीचा वरचा आणि खालचा भाग कापून घ्या. आणि प्रत्येक भेंडीच्या तुकड्यावर चिरा करा.
शेंगदाण्याच्या कूटामध्ये, गूळ, हळद, मीठ,गरम मसाला, आमचूर पावडर, धने-जीरे पूड, आणि थोडी कोथिंबीर घालून सर्व मसाला एकत्रित मिक्स ककरुन घ्या.
आता, भेंडीमध्ये हा तयार केलेला मसाला व्यवस्थित भरा.
एका कढईत तेल गरम करा. यामध्ये लसूण आणि हिंग घाला. लसूण सोनेरी झाल्यावर कढईमध्ये भरलेली भेंडी घाला.
भेंडीला मंद आचेवर शिजवा. नंतर गॅस बंद करा आणि कोथिंबीरीने सजवा.
चटपटीत भरलेली भेंडी तयार आहे. चपाती किंवा भाकरीसोबत याचा आनंद घ्या.