ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गाजर, हळद, लाल तिखट, जीरे, बडिशेप, मेथीचे दाणे, मोहरी, आमचूर पावडर आणि तेल.
सर्व प्रथम,गाजर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. नंतर ते सोलून घ्या. आणि एका आकारात कापून घ्या.
कापलेल्या गाजराच्या तुकड्यांना एका भांड्यात ठेवा. त्याला चवीनुसार हळद आणि मीठ लावा.
एका पॅनवर सर्व मसाले मंद आचेवर भाजून घ्या. आणि मिक्सरमध्ये हा मसाला वाटून घ्या.
हळद मीठ लावून ठेवलेल्या गाजरामध्ये हा मसाला मिक्स करा. यामध्ये तुमच्या चवीनुसार आमचूर पावडर आणि लाल तिखट मिक्स करा.
एका पॅनमध्ये तेल गरम करुन घ्या. यामध्ये मसाला लावून ठेवलेले गाजर मिक्स करा. आणि चांगले परतून घ्या. लोणचं थंड झाल्यावर काचेच्या बरणीत ठेवा.
तयार आहे तुमचं चटपटीत गाजराचं लोणचं, गरमागरम डाळ भातासोबत करा सर्व्ह .