ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकदा हिवाळ्यात आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने आपण अनेक आजारांना बळी पडतो.
थंडीच्या वातावरणात तुम्ही दूध जिलेबी खाऊ शकता. यामुळे हिवाळ्यातही शरीर आतून गरम राहते आणि उर्जा मिळते.
तज्ज्ञांच्या मते, दूध जिलेबी खाल्ल्याने ताण कमी होण्यास मदत होते.
जर तुम्हाला माइग्रेनचा त्रास असेल तर तुम्ही दूध जिलेबी नक्की खा. यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होईल.
जर तुम्ही खूपच बारिक असाल तर वजन वाढवण्यासाठी दूध जिलेबीचे सेवन करु शकता.
तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात गरम दूधासोबत जिलेबी खाल्ल्याने अस्थमा सारख्या आजारापासूनही आराम मिळतो.
दूध जिलेबी खाण्याची योग्य वेळ सकाळी आहे. तुम्ही सकाळच्या नाश्त्यात खाऊ शकता.
दूध आणि जिलेबी गोड असल्यामुळे जास्त प्रमाणात खाऊ नका. जास्त प्रमाणात सेवन केल्यास काही परिणामही होऊ शकतात.