ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर तुम्हाला आरोग्य सुधारायचे असेल तर चालणे हा सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. केवळ वजन कमी करण्यासाठी नाही तर चालल्याने मन, हृदय आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते.
दररोज १० हजार पावलं चालल्याने शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुरळीत राहते.ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
वजन कमी करण्यासाठी दररोज १० हजार पावलं चालणे फायदेशीर आहे. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. आणि पोटातील चरबी कमी होते.
चालल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. मधुमेह रुग्णांसाठी चालणे फायदेशीर ठरु शकते.
चालणे केवळ शरीरासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठी चांगले आहे. यामुळे तणाव आणि नैराश्य कमी होते. आणि मूड सुधारण्यास मदत होते.
दररोज चालल्याने हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
दररोज १०,००० पावलं चालल्याने शरीरातील उर्जा पातळी वाढते. ज्यामुळे दिवसभर उत्साही आणि अॅक्टिव्ह वाटते.