ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वाढत्या वयामुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकदा कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या जाणवू लागते. यासाठी तुम्ही घरातच हेअर डाय बनवू शकता.
पांढऱ्या केसासाठी लोक हेअर डायचा वापर करतात. पण यामुळे केस ड्राय आणि निस्तेज होतात.
पण ही केस वेळेसोबत पुन्हा पांढरे होतात. घरगुती उपायाने तुम्ही तुमचे केस काळे करु शकता. कसे, जाणून घ्या.
एका भांड्यात थोडे खोबरेल तेल घ्या. आणि यामध्ये आवळ्याची वापडर मिक्स करा. यांना काळा रंग येईपर्यंत शिजवा.
हा पेस्ट थंड करुन रात्री झोपण्याच्या अगोदर केसात लावा. आणि हलके मालिश करा.
दुसऱ्यादिवशी सकाळी केस स्वच्छ धुवून घ्या.
महिनाभर या तेलाचा वापर केल्याने तुमची केस काळी होतील.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.