ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
इडली सांबार हा अनेकांचा आवडीचा नाश्ता आहे. घरात इडली बनवण्यासाठी ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा.
तांदूळ, मेथी दाणे, उडीद दाळ आणि पोहे.
सर्वप्रथम तांदूळ आणि उडदाची डाळ २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून वेगवेगळ्या भांड्यात सात ते आठ तासांसाठी भिजवत ठेवा. तांदूळ आणि डाळीसह १ चमचा मेथा दाणे भिजवत ठेवा. एक वाटी पोहे स्वच्छ धुवून पोहे देखील भिजवत ठेवा.
भिजवलेले तांदूळ मिक्सरला बारीक करुन घ्या, उडदाच्या डाळीसह मेथीचे दाणे मिक्स करुन बारीक करुन घ्या. पोहे देखील मिक्सरला बारीक करुन घ्या.
मिक्सरमध्ये बारीक केलेले तांदूळ, डाळ आणि पोहे एका भांड्यात मिक्स करुन हे बॅटर आठ ते ९ तासासाठी किंवा रात्रभर झाकून ठेवा.
बॅटर सकाळी चांगले फुगल्यानंतर यात थोडे मीठ घाला आणि बॅटर व्यवस्थित मिक्स करुन घ्या. इडलीच्या भांड्याला तेल लावून त्यात बॅटर टाका. आणि १० मिनिटांसाठी इडली वाफवून घ्या.
साऊथ स्टाइल मऊ लुसलुशीत फरफेक्ट इडली तयार आहे. सांबार किंना नारळाच्या चटणीसह इडलीचा आस्वाद घ्या.