ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काही दिवसातच आयपीएल २०२५ चा थरार सुरु आहे. २२ मार्चपासून सुरु होणारी ही स्पर्धा २५ मेपर्यंत चालणार आहे.
भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी जिओने एक खास ऑफर आणली आहे. आयपीएल पाहण्यासाठी तुम्हालाही पैसे मोजावे लागत असतील. तर तुम्हीही आता आयपीएल फुकटात पाहू शकता.
जिओने आपल्या जुन्या आणि नवीन ग्राहकासांठी एक नवीन प्लान लाँच केला आहे. २९९ किंवा त्यापेक्षाही अधिकच्या प्लॅानमध्ये तुम्हाला काही जबरदस्त फायदे मिळणार आहे.
या ऑफरचा फायदा उचलण्यासाठी ग्राहकांना १७ ते ३१ मार्चपर्यंत जिओ सिम विकत घ्यावे लागेल.
जर तुमच्याकडे जिओ सिम असेल तर तुम्हाला २९९ किंवा त्यापेक्षा अधिकचा रिचार्ज करावा लागेल. २९९ च्या रिचार्जमध्ये तुम्हाला १.५ gb चा डेली डेटा देखील मिळणार आहे.
17 मार्चआधी रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी जिओने १०० रूपयांचा अॅड ऑन पॅक आणला आहे. यामुळे तुम्ही ९० दिवसांसाठी आयपीएल पाहू शकता.
जिओहॉटस्टारचा फ्री पॅक २२ मार्च २०२५ पासून ९० दिवसांपर्यंत चालू राहिल. अधिक माहितीसाठी तुम्ही जिओच्या वेबसाइटवर देखील जाऊ शकता.