ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्हालाही रेस्टॉरेंट स्टाइल साऊथ इंडियन डोसा घरी बनवायचा असेल ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा.
तांदूळ, उडीद दाळ, उकडलेले बटाटे, मेथीचे दाणे, तेल, हिरवी मिरची, हळद, मीठ मोहरी, कांदा आणि कढीपत्ता
सर्वप्रथम, तांदूळ, उडीद डाळ आणि मेथीचे दाणे ४ ते ५ तास भिजत घाला. नंतर मिक्समध्ये बारीक करुन घ्या. बॅटर तयार करा. आणि रात्रभर राहू द्या.
आता बटाट्याच्या मसाल्यासाठी, उकडलेले बटाटे मॅश करा. एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घाला.
नंतर कांदा घालून परतून घ्या आणि हळद, मीठ घाला, त्यानंतर बटाटे घाला आणि मसाला तयार करा.
पॅन गरम करा आणि त्यात डोसा बॅटर घाला आणि गोल आकारात पसरवा. डोसा सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
नंतर मध्यभागी बटाट्याचा मसाला भरा आणि डोसा अर्धवट पलटून घ्या.
साउथ स्टाइल मसाला डोसा तयार आहे. नारळाची चटणी किंवा सांबार सोबत मसाला डोसाचा आस्वाद घ्या.