ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर तुम्हालाही घरात नाश्त्याला परफेक्ट साऊथ स्टाइल क्रिस्पी मेदू वडा बनवायचे असेल कर ही रेसिपी नक्की ट्राय करा.
उडीद दाळ, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, ताजे नारळाचे तुकडे, कढीपत्ता, पाणी, तेल, आणि मीठ
सर्वप्रथम उडीद दाळ रात्रभर भिजवा. डाळ चांगली फुगली कि मिक्समध्ये जाडसर वाटून बॅटर काढून घ्या. डाळ वाटताना फक्त २ ते ३ चमचे पाणी घाला.
एका भांड्यात बॅटर काढून घेऊन बॅटर ढवळत राहा. बॅटर फेटताना १ चमचे पाणी घाला. बॅटरचा रंग पांढरा होईपर्यंत ढवळत राहा.
एक चमचा बॅटर पाण्यात टाका, जर ते व्यवस्थित तरंगत असेल तर तर बॅटर पूर्णपणे तयार आहे.
बॅटरमध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेले नारळ, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून बॅटर व्यवस्थित मिक्स करुन घ्या.
वडे तळायला एका कढईत तेल गरम करुन घ्या. हातावर चमचाभर बॅटरचा जाड गोळा बनवा. आणि बोटाच्या साहाय्याने मधोमध छिद्र करुन वडा तेलात सोडा.
मेदू वडा सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. साऊथ स्टाइल सॉफ्ट आणि क्रिस्पी मेदू वडा तयार आहे. नारळाची चटणी किंवा सांबारसोबत गरमागरम मेदू वडाचा आस्वाद घ्या.