ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पहिल्यांदा तुमच्या अंदाजानुसार गव्हाचे पीठ घ्या.
गव्हाच्या पीठात १ वाटी बीट रुटचा बारीक किस करुन तो एकत्रित करा.
यासोबतच बारीक केलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मिठ मिस्क करुन घ्या.
या सर्व मिश्रणात तुमच्या अंदाजानुसार पाणी टाकून ते व्यवस्थित मळून घ्या.
पिठ मळून झाल्यानंतर गोळ आकाराची पोळी करुन ती गरम तव्यावर भाजून घ्या.
चपाती भाजताना त्याला तेलाच्या जागी तुम्ही तूपही लावू शकता.
शेवटी तयार झाली मऊ लुसलुशीत बीटरुट चपाती.