Koliwada Masala: घरच्या घरी तयार करा कोलीवाडा मसाला; प्रत्येक भाजी बनेल रूचकर

Surabhi Jayashree Jagdish

कोलीवाडा मसाला

कोलीवाडा पनीर, चिकन आणि फिश आपण बहुतेक वेळा हॉटेलमध्ये खातो. पण आता तोच चविष्ट स्वाद आपण घरीही तयार करू शकतो. यासाठी खास कोलीवाडा मसाला बनवणं खूप सोपे आहे.

homemade spice mix India

खास रेसिपी

ही एकदम खास आणि सोपी रेसिपी आहे. ही रेसिपी वापरून तुमच्या पदार्थांना वेगळाच चविष्ट ट्विस्ट मिळतो. पनीर, चिकन किंवा फिशसाठी हा मसाला उत्तम ठरतो.

fish koliwada masala

मसाल्यासाठी लागणारे खडे मसाले

या मसाल्यासाठी मेथी दाणे, साबुत धने, वेलची, लवंग आणि काळी मिरी घ्या. तसंच जिरं, मोठी वेलची आणि काळी मोहरीही आवश्यक आहे. हे सर्व मसाले एकत्र करूनच खरी चव तयार होते.

paneer koliwada masala

पूड मसाल्यांची भर

खड्या मसाल्यांसोबतच मीठ, हळद, लाल तिखट आणि धने पावडर वापरली जाते. हे मसाले चव आणि रंग दोन्ही वाढवतात. यामुळे कोलीवाडा मसाल्याला परफेक्ट टेस्ट मिळते.

Indian masala recipes

मसाले भाजण्याची पद्धत

सर्वप्रथम एका पॅनमध्ये खडे मसाले टाकून मंद आचेवर भाजा. थोड्या वेळाने त्यात पूड मसाले घालून चांगले मिक्स करा. सगळे मसाले एकत्र फ्राय केल्याने त्यांचा सुगंध खुलतो.

easy homemade masala

मसाला थंड करून वाटणं

मसाले भाजून झाल्यावर ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालून वाटून घ्या. यामुळे मसाला व्यवस्थित आणि टिकाऊ तयार होतो.

restaurant style masala

मसाला वापरण्याची पद्धत

हा मसाला चहापत्तीपेक्षा बारीक आणि पूर्ण पावडरपेक्षा थोडा जाड वाटा. तुम्ही हा मसाला कोणत्याही भाजी किंवा पदार्थात वापरू शकता. वेळ कमी असताना झटपट चविष्ट भाजी बनवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

traditional Indian spices

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वयंपाकात कोणते मसाले वापरले जायचे?

ginger and garlic in Maratha food
येथे क्लिक करा