ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आदल्या रात्रीच्या उरलेल्या भाताचा वापर करून घरी नाश्त्यासाठी मऊ इडली बनवण्याची ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा.
उरलेला भात, रवा, दही, पाणी, मीठ, बेकिंग सोडा आणि तेल.
मऊ इडली बनवण्यासाठी, सर्वप्रथम एका भांड्यात उरलेले भात, रवा आणि दही घ्या आणि ते चांगले मिसळा.
नंतर त्यात पाणी, बेकिंग पावडर आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
सगळे साहित्य व्यवस्थित एकत्र करुन गुळगुळीत पीठ बनवा आणि ते झाकून 10 ते 15 मिनिटे राहू द्या.
आता इडली स्टँडवर थोडे तेल लावा, पीठ साच्यात ओता आणि 10 ते 15 मिनिटे वाफवून घ्या.
रात्रीच्या उरलेल्या भातापासून बनवलेली तुमची मऊ इडली तयार आहे, नारळाच्या चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा.