Moong Dal Dhokla: १५ मिनिटांत बनवा सॉफ्ट अन् स्पॉन्जी मूग डाळ ढोकळा, वाचा रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

मूग डाळ, आलं, हिरवी मिरची, दही, लिंबू, हळद, मीठ, कढीपत्ता, मोहरी, आणि तेल

dhokla | yandex

डाळ भिजवा

सर्वप्रथम मूगाची डाळ चार ते ५ तासांसाठी भिजवा.

dhokla | yandex

पेस्ट

डाळ व्यवस्थित भिजल्यानंतर मिक्सरमध्ये आलं आणि हिरवी मिरची घालून बारीक वाटून पेस्ट तयार करा.

dhokla | freepik

दही

आता, या पेस्टमध्ये दही, लिंबू, हळद आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.

dhokla | yandex

सेट करा

यामध्ये इनो घालून मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या. ढोकळ्याचा साचा किंवा एका ताटाला तेल लावून हे मिश्रण घालून सेट करा.

dhokla | yandex

बेक करा

कढईमध्ये पाणी घालून एक भांड ठेवा. त्यावर सेट केलेल्या मिश्रणाचे ताट ठेवा. आणि १५ मिनिटांसाठी ढोकळा बेक करा. किंवा स्टीमरमध्ये बेक करा.

Dhokla | google

फोडणी द्या

ढोकळा थंड झाल्यावर, एक पॅनमध्ये तेल घालून मोहरी, कढीपत्ता, मीठ, साखर आणि पाणी घालून हे मिश्रण चांगले उकळून घ्या आणि ढोकळ्यावर पसरवा.

dhokla | yandex

मूग डाळ ढोकळा तयार आहे

हेल्दी अन् टेस्टी मूग डाळ ढोकळा तयार आहे. पुदीना किंवा गोड चटणीसोबत सर्व्ह करा.

dhokla | yandex

NEXT: सतत एसी चालू ठेवल्याने काय परिणाम होतो? किती तास सुरू ठेवायचा असतो?

AC. | yandex
येथे क्लिक करा