ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बऱ्याचदा लोक त्यांच्या खोलीमध्ये तासनतास एसी चालू ठेवतात.
सलग तासनतास एसी चालू ठेवल्याने दुर्घटना होण्याचा धोका वाढतो.
आज,आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सलग किती तास एसी चालू ठेवणे योग्य आहे.
एसीचा वापर हे एसीची क्षमता, खोलीचे तापमान, एसीची सर्व्हिसिंग अशा अनेक गोष्टींवर अवलंबून आहे.
स्प्लिट एसी आण विंडो एसी सतत २४ तास चालू ठेवू शकतो.
एसीची नियमित सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे. तसेच एसी फिल्टर आणि कंडेन्सर वेळोवेळी स्वच्छ केले पाहिजे.
एसी जास्त वेळ चालू ठेवल्याने वीज बिलात लक्षणीय वाढ होते. यासाठी एसीचे तापमान २४ ते २६ अंशावर सेट करा.