Surabhi Jayashree Jagdish
भारतात मकर संक्रांतीचा सण तीळगुळाशिवाय अपूर्ण मानला जातो. हा फक्त परंपरेचा भाग नसून आपापसातील नात्यांमधील गोडवा व्यक्त करणारा आहे.
अनेकदा लोक घरच्या घरी झटपट चविष्ट लाडू बनवतात. घरगुती लाडू बनवलेले तुमच्या आरोग्यासाठी चांगले असतात. तसंच त्यांची चवही अधिक खास असते.
पहिल्यांदा तिळ मंद आचेवर भाजून घ्या. यावेळी तिळ जळू नयेत याची काळजी घ्या. भाजलेले तिळ लाडूंना सुगंध आणि चव देतात.
त्यानंतर एका कढईत तूप आणि गूळ घाला. मंद आचेवर गूळ वितळेपर्यंत गरम करावा. गूळ पूर्णपणे वितळल्यावर मिश्रण तयार होतं.
गूळ वितळल्यावर त्यात वेलची पावडर आणि शेंगदाणे घालून परतून घ्यावेत. यामुळे लाडूंना खास चव आणि कुरकुरीतपणा मिळतो.
त्यानंतर त्यात भाजलेले तिळ घालावेत. सर्व घटक नीट मिसळून एकसंध मिश्रण तयार करावं. यामुळे लाडू बांधायला सोपे होतात.
शेवटी गॅस बंद करून मिश्रण थोडं थंड होऊ द्यावं. हलकं थंड झाल्यावर हाताने लाडू वळावेत. अशा प्रकारे चविष्ट तीळगुळ लाडू तयार होतात.