ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
झटपट बनणारी हा काजू व्हेजिटेबल उपमा रेसिपी ट्राय करा.
रवा, मटार, काजू, मोहरी, कढी पत्ता, हिरवी मिरची, आलं, कांदा, तेल,मीठ, कोथिंबीर आणि लिंबाचा रस
सर्वप्रथम रवा चांगला हलका सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. आणि एका ताटात काढून ठेवा.
एका कढईमध्ये तेल गरम करुन यामध्ये मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, बारीक चिरलेले आलं आणि बारीक चिरलेला कांदा घालून मसाला चांगला भाजून घ्या.
आता, यामध्ये शिजवलेले मटार आणि काजू घाला. यासोबतच पाणी आणि मीठ घालून मिश्रण उकळवा.
पाणी उकळल्यावर, यामध्ये भाजलेला रवा घाला. गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या. आणि झाकण लावून मंद आचेवर शिजवा.
गरमागरम काजू मटार उपमा तयार आहे. यामध्ये लिंबाचा रस घाला आणि कोथिंबिर घालून सजवा. गरमागरमा उपमा सर्व्ह करा.