Dhanshri Shintre
आज आपण वजन कमी करण्यासाठी पौष्टिक आणि चविष्ट प्रोटीन चाट कसा तयार करायचा याची रेसिपी जाणून घेऊया.
भाजलेले शेंगदाणे, कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लिंबू, मीठ, लाल मिरची, चाट मसाला आणि तूप यांची आवश्यक सामग्री.
पॅनमध्ये तूप गरम करून त्यात मीठ आणि मसाले टाका, मग शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्या.
भाजलेले शेंगदाणे टिश्यू पेपरवर ठेवा, त्यामुळे अतिरिक्त तेल शोषले जाईल आणि शेंगदाणे अधिक कुरकुरीत आणि खमंग बनतील.
सर्व भाज्या स्वच्छ धुऊन घ्या आणि नंतर टोमॅटो, कांदा आणि काकडी बारीक चिरून तयार ठेवा.
एका बाउलमध्ये चिरलेल्या भाज्या, भाजलेले शेंगदाणे, मीठ, मिरपूड, चाट मसाला आणि चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाका व मिश्रण तयार करा.
सर्व साहित्य भेळसारखे व्यवस्थित एकत्र मिक्स करा, खात्री करा की सर्व मसाले समरसून मिसळले जातील आणि स्वाद उत्तम येईल.
चाटवर चिरलेली कोथिंबीर आणि अर्धं लिंबू पिळून घाला, नंतर चविष्ट चाट सर्व्ह करा.