ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदलते वातावरण, प्रदूषण आणि धूळ यामुळे चेहरा ड्राय होतो. आणि चेहऱ्यावर पिंपल्स येतात.
संत्र्याच्या सालीचा असा वापर करुन तुम्हीही त्वचेच्या अनेक समस्यापासून आराम मिळवू शकता.
संत्र्याच्या सालींना आणि गुलाबाच्या पाकळ्यांना उन्हामध्ये कडक सुकवा.
सुकल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पावडर सारखी वाटून घ्या. आणि हवाबंद डब्यामध्ये पॅक करुन ठेवा.
२ ते ३ चमचे पावडर घ्या. यामध्ये २ चमचे दूध आणि थोड ग्लिसरिन घालून मिक्स करुन पेस्ट तयार करा.
हा पॅक चेहऱ्यावर लावा. आणि १५ मिनिटांनी चेहरा धुवा.
आठवड्यातून दोनदा हा पॅक चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जातील. आणि चेहऱ्यावर ग्लो येईल.