Tanvi Pol
एका वाडग्यात गव्हाचं पीठ घट्ट मळून घ्या.
ही मळून झालेली कणिक थोडा वेळ झाकून ठेवा आणि नंतर लाटून लांबट पट्ट्या कापा.
कापलेल्या या पट्ट्या मॅगीच्या नुडल्ससारख्या दिसायला हव्यात.
एका कढईत तेल गरम करून त्यात हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कांदा परता.
त्यानंतर त्यात गाजर, मटार, शिमला मिरचीसारखी आवडती भाजी घालून चांगली परता.
नंतर कापलेले नुडल्स त्यात घालून थोडं पाणी आणि मीठ टाका.
झाकण ठेवून ५-७ मिनिटं शिजवून घ्या आणि मॅगी गरम गरम सर्व्ह करा