Saam Tv
बासमती तांदूळ, तूप, जिरे, मीठ, पाणी, कोथिंबीर इत्यादी.
सर्वप्रथम बासमती तांदूळ शिजवून घ्या. तुम्ही घरचे तांदूळ सुद्धा वापरू शकता.
एक भांडे गॅसवर ठेवा. आता त्यात एक मोठा चमचा तूप तापवा.
तूप तापल्यावर त्यात जिरे घाला.
आता शिजवलेले मोकळे तांदूळ घाला. सोबत मीठ घाला.
आता तांदूळ चांगले हलक्या हाताने परतून घ्या.
शेवटी २ चमचे कोथिंबीर वरून सजवा. आपल्या आवडत्या ग्रेव्हीसोबत जिरा राईसचा आस्वाद घ्या.