ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चटपटीत समोसे खायला कोणाला आवडत नाहीत. मात्र त्यामध्ये असलेला मैदा आणि तेल यामुळे अनेकजण खात नाहीत.
मात्र आज आम्ही तु्म्हाला हेल्दी समोसा कसा बनवू शकता हे सांगणार आहोत.
१.५ कप गव्हाचे पीठ, २ चमचे तेल, (मोहनसाठी), १/२ चमचा ओवा (Ajwain), चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी
२ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, १/२ कप उकडलेले हिरवे मटार, १/२ कप बारीक चिरलेला गाजर/बीन्स, १/२ चमचा जिरे, चिमूटभर हिंग, आले, १/२ चमचा धने पूड, १/२ चमचा जिरे पूड, १/४ चमचा हळद, १/२ चमचा गरम मसाला, १/२ चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ, ओवा, मीठ आणि २ चमचे तेल एकत्र करा. थोडं पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या
उकडलेले बटाटे (आणि इतर भाज्या) हाताने थोडे जाडसर कुस्करून घ्या. एका कढईत १ मोठा चमचा तेल गरम करून त्यात जिरं-हिंग घालून तडतडू द्या. यानंतर आले आणि हिरव्या मिरच्या घालून एक मिनिटं परतून घ्या.
आता कुस्करलेला बटाटा, उकडलेले मटार, धने पूड, जिरे पूड, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर आणि मीठ घाला. सर्व साहित्य चांगले मिसळून २-३ मिनिटे परतून घ्या. गॅस बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
मळलेल्या पिठाचे छोटे-छोटे गोळे तयार करून त्याचा अर्धगोल करा. याचा शंकूचा आकार तयार करा आणि कडा दाबून चिकटवून घ्या. त्यात सारण भरा आणि समोसा बनवा.
एअर फ्रायरला १८०°C ला प्रीहीट करून त्याच समोसे ठेवा. १५-२० मिनिटे एअर फ्राय करा, मधूनच समोसे पलटून घ्या. जेणेकरून ते सर्व बाजूंनी चांगले कुरकुरीत होतील. झाले तुमचे हेल्दी समोसे तयार.