Upma Recipe:सकाळच्या ब्रेकफास्टला सोप्या पद्धतीनं बनवा हेल्दी अन् टेस्टी रवा उपमा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

रवा, तेल, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, हिरवी मिरची, जिरे, मोहरी, साखर, मीठ, शेंगदाणे, कढीपत्ता

healthy | Yandex

रवा भाजून घ्या

सर्वप्रथम एका कढईमध्ये रवा मंद आचेवर भाजून घ्या.

tasty | Yandex

फोडणी तयार करा

त्यानंतर त्या कढईमध्ये तेल गरमकरून जिरे, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्त्याची फोडणी तयार करा.

homemade | Yandex

कांदा भाजून घ्या

त्यानंतर फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून चांगला सोनेरी होऊ द्या. नंतर त्यामध्ये शेंगदाणे आणि टोमॅटो टाकून चांगलं मिक्स करून घ्या.

breakfast | Yandex

उकळी येऊ द्या

त्यानंतर सर्व मिश्रणात रवा, मीठ आणि थोडीसाखर मिक्स करा. सरळ चांगलं एकत्र करून त्यामध्ये गरम पाणी घालून झाकण लावून ठेवा.

tasty breakfast | Yandex

कोथंबिर टाकून सजवा

त्यानंतर ५ ते १० मिनिटांनंतर झाकण काढून त्यावरून बाारीक चिरलेली कोथंबिर टाकून सजवा.

hot breakfast | Yandex

गरमागरम पौष्टिक उपमा तयार

तुमचा अगदी १५ मिनिटांमध्ये गरमागरम पौष्टिक उपमा तयार आहे.

morning | Yandex

NEXT: न आंबवता नाश्त्याला 10 मिनिटांत बनवा जाळीदार डोसा, मॉर्निंग होईल गुड

Breakfast Recipes | SAAM TV
येथे क्लिक करा...