ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मटार पनीर पराठा हा जितका टेस्टी आहे तितकाच हेल्दी देखील आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरीच बनवू शकता. रेसिपी नक्की ट्राय करा.
मटार, पनीर, आलं- लसूण- मिरची पेस्ट, धणे, जीरे पावडर, चाट मसाला, गव्हाचे पीठ, मीठ, कोथिंबीर आणि तेल
गव्हाच्या पीठात थोडे तेल आणि मीठ तसेच गरजेनुसार, पाणी घालून पीठ मळून घ्या.
मटार हलके वाफवून स्मॅश करुन घ्या.
मटारमध्ये आलं- लसूण- मिरची पेस्ट, किसलेले पनीर, धणे- जीरे पावडर,चाट मसाला, मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या.
एक पीठाचा गोळा घ्या. यामध्ये मिश्रण भरुन पराठा लाटून घ्या. तव्यावर तेल घालून पराठा दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.
गरमागरम हेल्दी आणि टेस्टी मटार पनीर पराठा तयार आहे. दही, लोणचं किंवा सॉससोबत पराठ्याचा आस्वाद घ्या.