Tomato Rice Recipe: टोमॅटोपासून तयार करा हेल्दी आणि स्वादिष्ट गुलाबी भात, झटपट रेसिपी

Dhanshri Shintre

टोमॅटो भात

आज आपण स्वादिष्ट टोमॅटो भात कसा बनवायचा ते शिकूया, जो सोपा आणि झटपट तयार होणारा असून जेवणात वेगळा आणि चविष्ट पर्याय ठरतो.

Tomato Rice | Google

साहित्य

टोमॅटो भातासाठी ३-४ टोमॅटो, शिजवलेले तांदूळ, तेल, मोहरी, उडीद डाळ, चना डाळ, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कांदा, मीठ, हळद आणि मिरची पावडर लागते.

Tomato Rice | Google

कृती

सुरुवातीला कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, उडीद डाळ आणि चना डाळ घाला आणि डाळी हलक्या बदामी रंगाच्या होईपर्यंत परतून घ्या.

Tomato Rice | Google

मिरच्या, कढीपत्ता घाला

यानंतर कढईत हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घाला, मग कांदा आणि मीठ टाकून सर्व पदार्थ चांगले परतून घ्या.

Tomato Rice | Google

सर्व घटक परतून एकसंध करा

मिश्रणात हळद आणि मिरची पावडर टाकून सर्व घटक चांगले परतून एकसंध करा, जेणेकरून मसाले नीट मिसळले जातील.

Tomato Rice | Google

चिरलेले टोमॅटो घाला

तयार झालेल्या मिश्रणात आता चिरलेले टोमॅटो घाला आणि सर्व घटक व्यवस्थित एकत्र करून चांगले मिक्स करा.

Tomato Rice | Google

व्यवस्थित शिजू द्या

टोमॅटो घातल्यानंतर पॅन झाकून ठेवा आणि मिश्रण ५ मिनिटे व्यवस्थित शिजू द्या, जेणेकरून टोमॅटो चांगले मऊ होऊन मसाल्यात मिसळतील.

Tomato Rice | Google

घटक चांगले मिसळा

यानंतर भात आवश्यकतेनुसार घालून सर्व आणि गरमागरम टोमॅटो भात सर्व्ह करण्यासाठी तयार करा.

Tomato Rice | Google

टोमॅटो प्यूरी ४-५ दिवस टिकेल

तुमच्या सोयीसाठी तयार केलेली टोमॅटो प्यूरी ४-५ दिवस फ्रीजमध्ये साठवून ठेवता येते, त्यामुळे ती भविष्यातील वापरासाठी उपयुक्त ठरते.

Tomato Rice | Google

NEXT: आरोग्यदायी आहारासाठी भात कधी खाल्ला पाहिजे? जाणून घ्या सविस्तर माहिती

येथे क्लिक करा