ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ढोकळा हा गुजराती पदार्थ असला तरी अनेकजण आवडीने ढोकळा खातात. तुम्हालाही घरच्या घरी मऊ ढोकळा बनवायचा असेल तर या टिप्स फॉलो करा.
बेसन, साखर, दही, आलं, हिरवी मिरची, तेल मोहरी, हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ आणि पाणी
सर्वप्रथम एका भांड्यामध्ये बेसन घ्या. बेसनमध्ये आलं, दही, साखर, मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, तेल आणि अर्धा कप पाणी घालून बॅटर व्यवस्थित एकत्र करा. बॅटर जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करु नका.
बेसनच्या बॅटरला १५ मिनिटांसाठी ठेवा. नंतर यामध्ये एक पॅकेट ईनो घालून मिक्स करा. नंतर एका ताटात बॅटर घालून सेट करायला ठेवा.
माइक्रोव्हेव किंवा ओवनमध्ये ढोकळा बेक करायला ठेवा. माइक्रोव्हेव्ह किंवा ओवन नसेल तर तुम्ही स्टीमरमध्ये ढोकळा १५ मिनिटांसाठी बेक करा.
एका कढईमध्ये तेल घालून यामध्ये मोहरी, कढीपत्ता, मीठ, साखर आणि पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा. हे मिश्रण चांगले उकळू द्या.
शिजलेल्या ढोकळ्यावर फोडणीचे पाणी व्यवस्थित पसरवा. आता, सॉफ्ट ढोकळा तयार आहे. पुदीन्याची चटणी किंवा गोड चटणीसोबत सर्व्ह करा.