ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
समुद्रसपाटीपासून २,६२५ फूट उंचीवर पश्चिम घाटात वसलेले माथेरान हे अॅडव्हेंचर, निसर्गप्रेमी आणि शांततापूर्ण विश्रांतीच्या शोधात असलेल्या पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.
येथून तुम्ही प्रबळ किल्ला, विशाळगड किल्ला आणि खोल दऱ्यांचे विहंगम दृश्यांचा आनंद घेऊ शकता. हे माथेरानमधील प्रसिद्ध पॉईंट आहे.
येथे तुम्ही सह्याद्रीच्या पर्वतांवरुन उगवत्या सूर्याचे नयनरम्य दृश्य पाहू शकता. पॅनोरमा पॉईंटला सनराइज पॉईंट असेही म्हणतात.
पावसाळ्यात हा लेक पूर्ण भरलेला असतो. येथील घनदाट जंगले आणि निसर्गाने वेढलेले हे ठिकाण शांतपूर्ण वेळ घालवण्यासाठी एक परफेक्ट ठिकाण आहे. येथे भगवान शंकराला समर्पित मंदिर देखील आहे.
या ठिकाणी पर्यटकांना आजूबाजूच्या टेकड्यांवरुन त्यांचाच आवाज पुन्हा ऐकू येतात. म्हणजेच येथे आवाजाचा इको होतो. निसर्गप्रेमींसाठी हे बेस्ट ठिकाण आहे.
नावाप्रमाणेच, मंकी पॉईंट हे खोडकर माकडांच्या संख्येसाठी प्रसिद्ध आहे. येथे भेट द्यायला विसरु नका.
नैसर्गिक सुंदरताने नटलेले हे शांत आणि सुंदर ठिकाण निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठरु शकतो. याशिवाय तुम्ही येथे घोडस्वारीचा आनंद देखील घेऊ शकता.