Shrikhand Recipe: घरीच बनवा ताजं आणि स्वादिष्ट श्रीखंड, विकतंच श्रीखंड नको अशी रेसिपी

Dhanshri Shintre

साहित्य

दूध, पिठीसाखर, केशर, सुका मेवा, वेलची पूड

Shrikhand Recipe | Yandex

कृती

प्रथम, १ किलो दूध उकळून त्याचं दही तयार करा. नंतर एका भांड्यावर चाळणी ठेवा, त्यावर पातळ कापड टाका आणि त्यात तयार केलेलं दही ओता.

Shrikhand Recipe | Yandex

खुंटीला लटकवा

दही असलेले कापड नीट बांधून २ तास खुंटीला लटकवा. त्यामुळे सर्व पाणी निघून जाईल आणि दह्याचा चक्का तयार होईल, ज्याचा वापर श्रीखंडासाठी केला जाऊ शकतो.

Shrikhand Recipe | Yandex

दही एका भांड्यात काढा

चक्का एका भांड्यात काढून चांगलं फेटून घ्या. त्यात पिठीसाखर घालून, वेलची पावडर घालून सर्व घटक एकत्र करून एक सुसंगत मिश्रण तयार करा.

Shrikhand Recipe | Yandex

केशरयुक्त दूध घाला

श्रीखंडाची चव अधिक चविष्ट करण्यासाठी त्यात केशरयुक्त दूध घाला आणि चांगल्या प्रकारे मिसळा, जेणेकरून त्यात एक खास आणि मधुर चव निर्माण होईल.

Shrikhand Recipe | Yandex

भांड्यात काढा

श्रीखंड तयार झाल्यानंतर, त्याला ज्या भांड्यात किंवा कपमध्ये सर्व्ह करायचं आहे, त्या भांड्यात घाला.

Shrikhand Recipe | Yandex

सुका मेवा टाका

श्रीखंडवर चिरलेला सुका मेवा टाका. नंतर, त्याला फ्रिजमध्ये थंडगार होण्यास ठेवा.

Shrikhand Recipe | Yandex

सर्व्ह करा

अतिशय स्वादिष्ट आणि गोड असे थंड श्रीखंड सर्व्ह करण्यासाठी तयार होईल.

Shrikhand Recipe | Yandex

NEXT: घरच्याघरी स्वादिष्ट मूग डाळ हलवा कसा बनवायचा? वाचा साधी आणि सोपी रेसिपी

येथे क्लिक करा