ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात तुम्हालाही काही तरी हलके आणि टेस्टी खावसं वाटतंय, मग ही दही तडका रेसिपी नक्की ट्राय करा.
दही, तेल, मोहरी, जीरा, कढीपत्ता, हळद, कांदा, लाल तिखट, लसूण, मीठ आणि कसुरी मेथी
सर्वप्रथम दहीला पातळ करण्यासाठी थोडे पाणी घालून चांगले फेटून घ्या.
एक पॅनमध्ये तेल गरम करा. यामध्ये मोहरी, जिरे, मेथीचे दाणे आणि लाल मिरची घालून परतून घ्या.
यामध्ये आता लसूण आणि कढीपत्ता, कांदा घाला. तसेच मीठ, लाल तिखट, हळद आणि कसुरी मेथी घालून मसाला परतून घ्या.
गॅस बंद करुन मसाल्यामध्ये दही घालून मिश्रण व्यवस्थित ढवळत राहा. जेणेकरुन दही घट्ट होणार नाही.
मसालेदार दही तडका तयार आहे. याला कोथिंबीरने सजवा आणि गरमागरम भातासोबत सर्व्ह करा.