Sabudana Kheer Recipe: घरच्या घरी सोप्या पद्धतीनं बनवा उपवास स्पेशल साबुदाण्याची खीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

भिजवलेला साबुदाणा, साखर, भिजवलेले खजूर, काजू, बदाम, मनुका, दूध, वेलची पावडर

Sabudana | Yandex

साबुदाणे भिजण्यासाठी ठेवा

सर्वप्रथम अर्धा वाटी साबुदाणे स्वच्छ पाण्याचा वापर करून धुवून घ्या. त्यानंतर त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून साबुदाणे भिजण्यासाठी ठेवा.

Kheer | Yandex

सोनेरी रंगाचे येईपर्यंत भाजा

एका कढईत तूप घेऊन त्यात काजू, बदाम, मनुका सोनेरी रंगाचे येईपर्यंत भाजा.

Upvas | Yandex

दूध गरम करा

एका भांड्यात दूध गरम होण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर त्यात साखर घाला.

Fasting | Yandex

साबुदाणा होईपर्यंत शिजवा

त्यानंतर गरम दुधात खजूर आणि साबुदाणे टाकून व्यवस्थित शिजवून घ्या. साबुदाण्याचा रंग पूर्णपणे पांढरा होईपर्यंत शिजवा.

Ekadashi | Yandex

खीर मिक्स करा

सगळ्यात शेवटी त्यामध्ये भाजलेले काजू बदाम आणि वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्या.

sago | Yandex

आरोग्यासाठी फायदेशीर

उपवास स्पेशल साबुदाण्याची खीर तयार आहे. साबुदाण्याची खीर चवीला गोड आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

health | Yandex

NEXT: घरच्या घरी बनवा सोप्या पद्धतीनं हेल्दी आणि टेस्टी बदामाची खीर

येथे क्लिक करा...