ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गव्हाचे पिठ, मैदा, बेकिंग पावडर, दालचिनी पावडर, कोमट दुध, साखर, बटर किंवा तेल, व्हाईट रोज इसेंन्स, मीठ, केळी, मध.
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये गव्हाचे पिठ, मैदा, बेकिंग पावडर, दालचिनी पावडर, मीठ आणि साखर एकत्र करा.
त्यानंतर त्यामध्ये मॅश केळी मिक्स करून सर्व मिश्रण एकत्र करून घ्या. त्यानंतर गॅसवर पाणी गरम होण्यास ठेवा.
पाणी कोमट झाल्यावर मिश्रणामध्ये मिक्स करा त्यानंतर त्यामध्ये थोड कोमट दुध आणि रोज व्हाईट इसेंन्स टाकुन मिश्रन चांगलं एकत्र करून घ्या.
तयार बॅटर १० ते १५ मिनिटं रेस्टवर ठेवा. त्यानंतर गॅसवर तवा चांगला तापवून घ्या आणि त्यावर बॅटर पसरवून दोन्ही बाजुने पॅनकेक खमंग भाजून घ्या.
त्यानंतर एका प्लेटमध्ये तयार पॅनकेक काढून त्यावर मधाची धार सोडा आणि वरुन थोडं बटर टाकून गरमा गरम पॅनकेक सर्व्ह करा.
यंदाच्या रक्षाबंधनाला तुमच्या लाडक्या भावाला किंवा बहिनीला हेल्दी टेस्टी बनाना पॅनकेक नक्की खायला द्या.