Dhanshri Shintre
नेहमीच्या भाज्यांचा कंटाळा आला असेल, तर आजच काहीतरी वेगळं करून बघा. स्वादिष्ट आणि सोपी टोमॅटोची भाजी तुमच्या जेवणात नवा स्वाद आणू शकते.
टोमॅटो, कांदा, जिरे, आल-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, धणेपूड, तेल, हिंग, मीठ, कोथिंबीर आणि साखर या साहित्याचा उपयोग स्वादिष्ट भाजी तयार करण्यासाठी होतो.
टोमॅटो स्वच्छ धुऊन त्याची साल काढा. नंतर कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून पुढील प्रक्रियेसाठी तयार ठेवा.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे आणि आल-लसूण पेस्ट घाला. मिश्रण सुवासिक होईपर्यंत परतत रहा.
पॅनमध्ये कांदा आणि टोमॅटो टाका. ते सुवासिक आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मध्यम आचेवर चांगले परता, जेणेकरून भाजीला उत्कृष्ट चव मिळेल.
आता मिश्रणात तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेपूड आणि साखर घालून चांगले मिक्स करा, जेणेकरून मसाले एकसंध होऊन भाजीला स्वादिष्ट चव येईल.
टोमॅटो आणि कांदा सॉफ्ट होईपर्यंत परता. नंतर त्यावर कोथिंबीर शिंपडा आणि गरमागरम भाजी तयार करून सर्व्ह करा.