Siddhi Hande
स्ट्रीट स्टाईल पावभाजी ही सर्वांनाच आवडते. परंतु घरी बनवलेल्या पावभाजी एक वेगळीच चव असते.
पावभाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कांदा, टॉमेटो, वाटाणे, शिमला मिरची, फ्लॉवर हे सर्व स्वच्छ धुवून घ्या.
यानंतर कुकरमध्ये कांदा, टॉमेटो हे सर्व पदार्थ टाका आणि कुकरचे गॅस बंद करा. ४ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा.
यानंतर एका कढईत तेल आणि बटर मिक्स करुन टाका. त्यानंतर त्यात आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाका.
यानंतर कढईत पावभाजी मसाला, तिखट, मिरची पावडर टाकून मस्त मिक्स करा.
यानंतर मिक्सरला शिजलेल्या भाज्या बारीक वाटून घ्या.
यानंतर हे सर्व मिश्रण कढईत टाकून मस्त मिक्स करा. त्यावर आवश्यकतेनुसार मीठ टाका.
कढईवर ५-१० मिनिटे झाकण ठेवून भाजी मस्त शिजवून घ्या. यानंतर मस्तपैकी पावभाजीचा आस्वाद घ्या.