Tanvi Pol
१ कप माव्यात दीड कप मैदा मिसळा.
त्यानंतर थोडं दूध घालून मऊ गोळा मळा.
लहान गोळे करून त्यांना चांगलं गोलसर करा.
मग मध्यम आचेवर तुपात तळून सोनेरी करुन घ्या.
दुसऱ्या भांड्यात २ कप साखर, १ कप पाणी घालून पाक तयार करा.
पाकात थोडीशी वेलची पूड आणि थोडं गुलाबजल घालावं.
गरम गुलाबजाम पाकात १ तास भिजू द्या आणि थंड झाल्यावर सर्व्ह करा.