ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गरमागरम डाळभातासोबत काही तरी कुरकुरीत आणि खमंग हवयं, मग ट्राय करा हे टेस्टी आणि सोपी बटाट्याच्या काचऱ्याची रेसिपी
३ ते ४ बटाटे, १/४ कप तांदळाचे मीठ, जीरे , मोहरी, तिखट, हळद, मीठ, आणि तळण्यासाठी तेल
सर्वप्रथम बटाट्याचे पातळ काप करुन घ्या. तुकडे करताच एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यांना पाण्यात ठेवा.
एका भांड्यात हळद, तिखट, मीठ आणि तांदळाचे पीठ एकत्र करुन घ्या.
बटाट्याचे काप पाण्यातून काढा आणि हलके टॉवेल किंवा टिश्यू पेपर वापरुन कोरडे करु घ्या. पूर्णपणे कोरडे करु नका.
आता बटाट्याचे काप तांदळाच्या पीठापासून तयार केलेल्या बॅटरमध्ये ठेवा. बटाट्याच्या तुकड्यांना दोन्ही बाजूंने व्यवस्थित बॅटर लावून घ्या.
एका तव्यावर थोडे तेल घालून गरम करुन घ्या. यामध्ये बटाट्याचे तुकडे ठेवा आणि दोन्ही बाजूने बटाटा मस्त ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या.
बटाट्याच्या काचऱ्या तयार आहे. गरमागरम डाळबातासोबत किंवा पोळीसोबत कुरकुरीत आणि खमंग बटाट्याच्या काचऱ्याचा आस्वाद घ्या.