Dhanshri Shintre
पावसाळ्यात गरम चहा आणि खमंग स्नॅक्सची मजा काही औरच असते. या दिवसांसाठी खास, चविष्ट सोया कटलेट्सची रेसिपी जाणून घ्या.
सोया कटलेटसाठी सोयाबीनचे तुकडे, उकडलेले बटाटे, कांदा, हिरव्या मिरच्या, आले-लसूण पेस्ट, ब्रेडक्रंब, तांदळाचे पीठ आणि हवे तसे मसाले घ्या.
कटलेटसाठी सोया चंक्स १०-१५ मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा, नंतर पाणी काढून त्यांना बारीक चिरून तयार करा.
आता उकडलेले बटाटे मॅश करून त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, धणे आणि हवे तसे कोरडे मसाले मिसळून मिश्रण तयार करा.
तयार मिश्रणात सर्व साहित्य नीट मिसळा आणि एकसंध करा. नंतर त्यात २ चमचे ब्रेडक्रंब घालून चांगले एकत्र करा.
ब्रेडक्रंब्स मिसळल्यानंतर थोडे तांदळाचे पीठ घालून मिश्रण घट्ट करा आणि नंतर त्याचे छोटे कटलेट्सच्या आकाराचे गोळे बनवा.
कटलेटचे गोळे तयार झाल्यावर त्यांना सर्व बाजूंनी ब्रेडक्रंबमध्ये घोळवा, ज्यामुळे तळताना ते अधिक कुरकुरीत आणि खमंग होतील.
पॅनमध्ये तेल गरम करा. तेल तापल्यावर तयार कटलेट सावधपणे त्यात सोडा आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्या.
नंतर मस्त गरमागरम चहा आणि सॉससोबत सर्व्ह करा.