Tanvi Pol
काही ब्रेड स्लाइसेसच्या कडा कापून घ्या.
उकडलेले बटाटे, मटार, हळद, तिखट, मिठ आणि मसाला मिक्स करून सारण तयार करा.
ब्रेडला थोडं पाणी लावून त्रिकोण आकारात वळवा.
तयार सारण त्यात भरून किनारे दाबून बंद करा.
सर्व ब्रेड समोसे अशाच प्रकारे तयार करा.
कढईत तेल गरम करून समोसे कुरकुरीत होईपर्यंत तळा.
सोनेरीसर झाले की बाहेर काढा आणि गरमागरम चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.