Tanvi Pol
एक कप पनीराचे मध्यम तुकडे करून घ्या.
त्यात १ चमचा दही, एक चमचा लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ आणि लिंबू रस घालून मिक्स करा.
हे मिश्रण १०-१५ मिनिटे मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यावे.
ब्रेड स्लाईसच्या किनाऱ्यांचे भाग कापून टाका.
एका ब्रेड स्लाईसवर पनीरचं मिश्रण ठेवा आणि दुसरी स्लाईस त्यावर ठेवा.
मधून कापून चौकोनी किंवा त्रिकोणी बनवा.
हे ब्रेड तुकडे तव्यावर तुपात किंवा बटरमध्ये दोन्ही बाजूंनी खरपूस शेकून घ्या त्यानंतर पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.