ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
त्वचा चमकदार बनवण्यासाठी बाजारात अनेक महागडे प्रोडक्ट्स उपलब्ध असतात. परंतु केमिकलयुक्त प्रोडक्टमुळे त्वचेला हानी पोहचू शकते.
या घरगुती उपायाने तुम्ही घरबसल्या चमकदार त्वचा मिळवू शकता.
त्वचेवर बेसनचा पॅक लावल्याने त्वचेवरील घाण निघून जाते. तसेच त्वचा चमकदार होते. बेसनचा फेस पॅक कसा बनवायचा जाणून घ्या.
सर्वप्रथम दोन चमचे बेसन घ्या. यामध्ये एक चमचा दूध किंवा दही मिक्स करा.
यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घाला. जर तुमची स्कीन ड्राय असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा मध देखील मिक्स करु शकता.
आता, यामध्ये अर्धा चमच हळद मिक्स करा. आणि संपूर्ण मिश्रण चांगले फेटून घ्या. तुमचा पॅक तयार होईल.
हा पॅक चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासाने चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल.