Shruti Vilas Kadam
जर तुम्हाला अशा पद्धतीची पारंपरिक नारळाच्या दूधातील सोलकढी करायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.
कोकमाचा आगळ, एका नारळाची चव, मिरची, लसणीच्या पाकळ्या, बारीक कोथिंबीर
नारळाची चव काढण्यासाठी मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये खवलेले खोबरे घेऊन ते पाणी घालून वाटा.
एखादा स्वच्छ रुमाल किंवा पातळ कपडा घेऊन मिक्सरमधील खोबऱ्याचे वाटप गाळून घ्या आणि नारळाचे दूध काढून घ्या.
एका भांड्यात नारळाचे दूध घेऊन त्यामध्ये चवीच्या अर्धा कोकमाचा आगळ घाला.
मिरची आणि लसणीच्या पाकळ्या बारीक वाटून त्या चवीसाठी रसामध्ये घाला.
जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये जिऱ्याची पूड घालण्यास काहीच हरकत नाही.
वरुन कोथिंबीर भुरभुरुन ही सोलकढी थंडगार सर्व्ह करा.