ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुलांसाठी घरीत बनवा समर स्पेशल कुल्फी सकाळी बनवा फॉलो करा ही सोपी रेसिपी
दुधापासून कुल्फी बनवण्यासाठी दूध 1.5 लिटर, साखर 1/2कप, वेलची पूड 1/2 चमचा, (पर्यायी) काजू, बदाम, पिस्ता (खसखशीसाठी)(पर्यायी), कॉर्नफ्लॉवर: 1-2 चमचे (दूध घट्ट करण्यासाठी)
एका भांड्यात दूध घेऊन मध्यम आचेवर उकळायला ठेवा.
दूध उकळायला लागल्यावर त्यात साखर आणि वेलची पूड टाका आणि चांगले मिक्स करा.
मिश्रण सतत ढवळत राहा, जेणेकरून ते खाली करड लागत नाही. दूध घट्ट होईपर्यंत (जवळजवळ 1/3 वाटे) उकळवा.
जर तुम्हाला कुल्फी अधिक घट्ट हवी असेल, तर थोडंसं थंड दुधात कॉर्नफ्लॉवर मिक्स करून, ते गरम दुधात टाका आणि चांगले मिक्स करा.
दूध पूर्णपणे थंड झाल्यावर, ते कुल्फीच्या साच्यात (किंवा प्लास्टिकच्या कपमध्ये) भरा.
साच्यातील मिश्रण 6-8 तास किंवा पूर्णपणे सेट होईपर्यंत फ्रीझरमध्ये ठेवा.
कुल्फी थंड झाल्यावर, ती साच्यातून बाहेर काढा आणि सर्व्ह करा