Christmas Plum Cake : ख्रिसमससाठी नॉन अल्कोहोल प्लम केक रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

युरोपियन पद्धत

ख्रिसमसला प्लम केक सुद्धा मोठ्या संख्येने खाण्याची पद्धत आहे. हा केक मुळात युरोपातला पदार्थ आहे.

Plum Cake | Yendex

केरळमध्ये सुरुवात

भारतात पहिल्यांदा १८८३ मध्ये केरळमध्ये तयार करण्यात आला होता. जगात एकूण १७ प्रकारचे प्लम केक तयार केले जातात.

Plum Cake | Yendex

प्लम केक बनवण्याचे साहित्य

२ वाटी मैदा, १ चमचा बेकिंग पावडर, १ चमचा सोडा १ चमचा सोडा, १ वाटी बदाम, काजू पिस्ता काप करून,मनुका, १/४ वाटी अपल तुकडे करून, १ वाटी साखर

Plum Cake | Yendex

प्लम केक बनवण्याचे साहित्य

१/४ वाटी आरेंज ज्यूस, ३ व्हॅनीला इसेन्स, १ पेला दूध, १ चमचा सुंठ पावडर व जायफळ पूड अ‍ॅड, थोडी चेरी तुकडे करून,टुटीफ्रुटी, १/४ कप कोको पावडर, ५ चमचे साखर

Plum Cake | Yendex

प्लम केक बनवण्याची कृती

प्रथम सर्व सुकामेवा व टुटीफ्रुटी,चेरी ऑरेंज ज्यूस मध्ये अर्धा तास भिजवून ठेवा . आता अ‍ॅपलचे बारिक तुकडे करून घ्या. पुढे पाच चमचे साखर पॅनमध्ये अ‍ॅड करून विरघळून घ्यावी.

Plum Cake | Yendex

साखर टाकून मिक्स करा

मग एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर आणि सोडा अ‍ॅड करून त्यात सुंठ पावडर व जायफळ पावडर मिक्स करा.आता कोको पावडर त्यात अ‍ॅड करा. मग साखर टाकून मिक्स करा आणि दुध अ‍ॅड करून घ्या.

Plum Cake | Yendex

दूध अ‍ॅड करा

मग त्यात दूध अ‍ॅड करा. आता उरलेले जिन्नस त्यात एकत्र करा. तुमचे मिश्रण तयार आहे. आता तुम्ही हवा त्या आकाराचा डबा घ्या. त्याला बटर किंवा तेल लावून घ्या. मग त्यात तयार बॅटर अ‍ॅड करा. हे तुम्ही गॅस, ओवन आणि कुकरमध्ये कशातही करू शकता.

Plum Cake | Yendex

डिजाईन

आता तो डबा झाकण लावून ४० मिनिटे मंद आचेवर ठेवू शकता. चला तुमचा प्लम केक तयार आहे. हा तुम्ही थंड झाल्यावर कापू शकता त्यावर तुम्ही हवी तशी डिजाईन सुद्धा तयार करू शकता.

Plum Cake Yendex | Yendex

Top 5 Party Wear Outfits : जान्हवी कपूरचे 'हे' पाच पार्टीवेअर आउटफीट्स एकदा पाहाच

janhavi kapoor | Google
येथे क्लिक करा