Dhanshri Shintre
४-५ लिंबाचे तुकडे, ताजे पुदिन्याचे पाने, साखरेचा पाक, पुदिना सिरप, ५०० मि.ली. सोडा, चवीनुसार लिंबाचा रस आणि बर्फ घालावा.
मोजिटो मॉकटेलसाठी सुरुवातीला लिंबूचे छोटे तुकडे करून बिया वेगळ्या करा, मग पुढील प्रक्रिया सुरू करा.
ग्लासमध्ये लिंबू, साखर आणि पुदिन्याची पाने टाका आणि सर्व घटक हलक्या हाताने मॅश करून मिक्स करा.
बर्फाचे तुकडे आणि लिंबाचा रस टाकून हलवा, त्यानंतर सोडा आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करा.
ग्लासाच्या काठाला अर्धा लिंबू फिरवा आणि नंतर तो काठ सौम्यपणे मिठामध्ये बुडवून सजवा.
ग्लास सजवून झाल्यावर त्यात तयार केलेले मोजिटो मॉकटेल ओता आणि वरून थोडा बर्फ टाका.
तुमच्या आवडीनुसार या मॉकटेलमध्ये अधिक सोडा घालू शकता, त्यामुळे चव अधिक ताजेतवाने वाटते.
ग्लासच्या काठावर लिंबाचे तुकडे व पुदिन्याची पाने ठेवून मॉकटेल थंडगार पद्धतीने सर्व्ह करा.