Siddhi Hande
पुढच्या आठवड्यात मकरसंक्रांत आहे. मकरसंक्रातीला नवीन लग्न झालेल्या महिला खास हलव्याचे दागिने घालतात.
मकरसंक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांना विशेष महत्त्व असते. हे दागिने तुम्ही स्वतः च्या हाताने घरी बनवू शकतात.
हलव्याचे दागिने बनवण्यासाठी रवा, साखर, पाणी, तूप, फूड कलर, दोरा आणि सुई आवश्यक आहेत.
सर्वात आधी तुम्हाला साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करा. त्यात साखर टाका.
या पाकात साखर पूर्णपणे विरघळू द्या. या पाकाला तार येण्याची गरज नाही.
सर्वात आधी तुम्ही दुसऱ्या कढईत तूप गरम करायचे आहेत. त्यात रवा मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे.
रवा भाजल्यावर त्यात साखरेचा पाक टाका. हे मिश्रण सतत हलवत राहा. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.
यानंतर हे मिश्रण थोडं ओलसर असतानाच त्याचे गोळे बनवायला घ्या. त्यात तुम्ही तुम्हाला आवडणारा कलर मिक्स करु शकतात.
यानंतर हाताला तूप लावून त्यावर हे मिश्रण ठेवा. त्याचे लहान गोळे,चौकोनी आकार वैगेरे बनवून घ्या.
यानंतर हे गोळे किंवा चौकोनी आकाराचे तुम्ही दागिने बनवू शकता. तुम्ही हे सर्व सुई दोऱ्याने ओवून घ्या.
या गोळ्यांनी तुम्ही हार, बांगड्या किंवा कानातले बनवू शकतात. यासाठी तुमची क्रिएटिव्ही वापरा.