Shreya Maskar
मकर संक्रांती काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मकर संक्रांतीला काळी साडी नेसून महिला साज श्रृंगार करतात. काळ्या साडीसोबत हलव्याचे दागिने प्रामुख्याने घालतात. महिला खूपच सुंदर दिसतात.
मकर संक्रांतीला महिला आवर्जून काळ्या रंगाची साडी नेसतात. नव वधूसाठी हा महत्त्वाचा सण असतो. तुम्हाला ही मकर संक्रांतीला हटके दिसायचे असेल तर काळ्या साडीवर ट्रेंडी डिझाईन्सचा ब्लाउज निवडा.
काळ्या रंगाच्या साडीवर लाल, काळा, गोल्डन, सोनेरी रंगाचे ब्लाउज उठून दिसतात. तुम्ही वेस्टन आणि पारंपरिक दोन्ही साड्यांवर हे घालू शकतात. साडीच्या काठानुसार ब्लाउजची निवडा करा.
बहुतेक वेळा काळ्या रंगाची साडी प्लेन असते त्यामुळे त्यावर एम्ब्रॉयडरी आणि सुंदर वर्क, नक्षीकाम असलेला ब्लाउजची निवड करा. शपिंग मार्केटमध्ये याची भन्नाट व्हरायटी मिळेल.
आजकाल डीपनेक ब्लाउज आणि फ्लोअर प्रिंट ब्लाउजचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा ब्लाउजमध्ये तुमचा लूक नक्कीच खुलेल.
तुम्हाला आवडत असेल तर स्लीव्हलेस ब्लाउज देखील तुम्ही घालू शकता. तसेच फुल स्लीव्हलेस आणि थ्री फोर स्लीव्हलेस देखील छान दिसतील.
मकर संक्रांतीला जर तुम्ही नेटची सुंदर साडी निवडली असेल तर रफल्ड स्लीव्ह्ज ब्लाउज उत्तम पर्याय आहे. रफल्ड ब्लाऊजचे अनेक फॅब्रिक्स बाजारात मिळतात. तसेच तुम्ही ऑनलाइन खरेदी करू शकता.
काळ्या साडीवर चुकूनही मॅचिंग ब्लाउज घालू नका. कॉन्ट्रास्ट रंगांचे ब्लाउज घाला. यामध्ये तुमचा लूक अजून उठून दिसेल.