ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ब्लॅक रंग एलिगंट आणि प्रोफेशनल लूक देतो. संक्रांतीच्या दिवशी ब्लॅकला पारंपरिक रंगांसोबत वेअर केल्यास फेस्टिव्ह पण ऑफिस-फ्रेंडली लूक मिळतो.
तुम्ही कॉटनची साधी ब्लॅक साडी घालून त्यावर मिसमॅच म्हणजे पिवळा रंगाचा ब्लाऊजवर घालू शकता. संक्रांतीसाठी हा लूक पारंपरिकही वाटतो आणि ऑफिससाठी योग्यही ठरतो.
ब्लॅक कुर्तीवर ऑरेंज दुपट्टा घेतल्यास लूक लगेच फेस्टिव्ह होतो. ऑफिसमध्ये साधा पण आकर्षक असा हा कॉम्बिनेशन खूप ट्रेंडमध्ये आहे.
ब्लॅक आणि ऑफ-व्हाइट हे क्लासिक कॉम्बिनेशन प्रत्येकाचे आवडते आहे. यावर तुम्ही पिवळा किंवा हिरवा दुपट्टा घेवू शकता.
सिल्क ब्लॅक साडी तुम्ही मकर संक्रांतीसाठी नेसू शकता. सिल्क साडी ऑफिससाठी सिंपल आणि एलिगंट लूक देते.
ब्लॅक कुर्तीवर वारली पेटिंग, कलमकारी किंवा एथनिक प्रिंट असलेली डिझाइन सणासुदीचा फील देते. ऑफिस वेअरसाठी ही एक स्मार्ट चॉईस आहे.
ब्लॅकवर सिल्व्हर ज्वेलरी छान दिसते. छोटे झुमके, ऑक्सिडाईडचे कानातले किंवा साधा कडा घालू शकता.
लो हिल्स, फ्लॅट सँडल आणि कोल्हापुरी चप्पल तुम्ही घालू शकता. तसेच साधा मेकअप करा जसे की, काजळ, न्यूड लिपस्टिक आणि हलका ब्लश लावा.