Manasvi Choudhary
मकरसंक्रांतील हलव्याचे दागिने घालणे ही जुनी परंपरा आहे. आजही मकर संक्रांतीनिमित्त हलव्याचे दागिने घालतात.
मकरसंक्रांतीला हलव्याचे दागिने घालण्याची परंपरा केवळ फॅशन नसून त्यामागे देखील खास कारणे आहेत ते या वेबस्टोरीच्या माध्यमातून जाणून घेऊया.
मकरसंक्रांत कडाक्याच्या थंडीत येते. तीळ आणि साखरेचा हलवा हे उष्ण प्रवृत्तीचे पदार्थ आहेत ज्यामुळे दागिने परिधान करून नंतर ते प्रसाद म्हणून खाण्याची परंपरा आहे.
"तिळगूळ घ्या, गोड बोला" या उक्तीप्रमाणे, साखरेच्या पाकापासून बनवलेले हे पांढरेशुभ्र दागिने आयुष्यात आणि नात्यात गोडवा निर्माण करण्याचे प्रतीक मानले जातात.
लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला सुनेला 'हलव्याचे दागिने' घालून नटवले जाते. हा तिच्या स्वागताचा आणि सत्कार करण्याचा एक कौटुंबिक सोहळा असतो.
लहान मुलांच्या आरोग्यासाठी आणि संरक्षणासाठी त्यांना हलव्याचे दागिने घालून त्यांचे 'बोरन्हाण' केले जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.