Manasvi Choudhary
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची मतमोजणी ५ फेब्रुवारीला होणार तर ७ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या घोषणेनंतर आजपासून १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या हद्दीत आचारसंहिता लागू झाली.
राज्य निवडणूक आयोगाने ज्या १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. त्यामध्ये ५० टक्क्यांमध्ये आरक्षण आहे.
लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहे.
जिल्हापरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी १६ जानेवारी ते २१ जानेवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २७ जानेवारी २०२६ दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. अंतिम उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्ह वाटप २७ जानेवारी रोजी होणार आहे.
https://saamtv.esakal.com/ampstories/web-stories/what-is-the-model-code-of-conduct-election-dos-and-donts-for-parties-and-candidates-election-commission-rules-msc01